मोदी-शाहंचा नवा गेम, पवारांची फिल्डिंगही फसली, महाराष्ट्रातून 16 आमदारांचं मुर्मूंना क्रॉस व्होट

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. दरम्यान राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 16 आमदारांची मतं फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षाने मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद पवारांची खेळी फसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे तब्बल 16 आमदार फुटल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रातच नव्हती तर देशभरातून अनेक मतं फुटल्याचं समोर आलं आहे. भाजपने मुर्मू यांच्या विजयासाठी मोठी तयारी केली होती. देशभरातून विचार करता 104 आमदारांची मत फुटल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

या निवडणुकीत एकूण 4800 निर्वाचित खासदार आणि आमदारांनी भाग घेतला. निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या आहेत. यांच्यानिमित्ताने देशात पहिल्यांदा एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसल्या आहेत. 27 पक्षांच्या समर्थनासह मुर्मू यांना मोठं मतदान होणार असल्याचं सांगितलं जात होतं. तर दुसरीकडे सिन्हा यांना 14 दलांचं समर्थन आहे.

एनडीएकडून द्रौपदी मुर्मू  तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी द्रौपदी मुर्मू  विजयी होतील, असं म्हटलं होतं. भाजप-शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीचे आमदारही त्यांना मतदान करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. पक्षमर्यादा सोडून किंवा पक्षादेश झिडकारून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.