अमरनाथ यात्रेदरम्यान गेल्या ३६ तासांत सहा यात्रेकरूंचा मृत्यू झाला. तसेच यात्रेकरूंची ने-आण करणारा एक घोडेस्वार मृत्युमुखी पडला. त्यामुळे यंदाच्या यात्रेतील मृत्युमुखी पडलेल्या एकूण यात्रेकरूंची संख्या ४९ झाली आहे. यात ८ जुलैला झालेल्या पावसाने आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या १५ जणांचाही समावेश आहे.
३० जूनपासून सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत एकूण ४७ यात्रेकरू व यात्रेकरूंची ने-आण करणाऱ्या दोन घोडेस्वारांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक घोडेस्वार पहलगाम येथे घोडय़ावरून खोल दरीत पडल्याने मृत्युमुखी पडला. ८ जुलैच्या पुरात १५ यात्रेकरू मृत्युमुखी व ५५ यात्रेकरू जखमी झाले आहेत. पवित्र अमरनाथ गुंफेचे आतापर्यंत दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे.