ज्या कंपन्यांच्या नावामध्ये ऑक्सिजनचा उल्लेख आहे, त्यां कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली आहे. गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये पैसे लावत आहेत. मात्र, त्या कंपन्यांबाबत वेगळीच गोष्ट समोर आली आहे. ऑक्सिजन तुटवड्याचा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला. ज्या कंपन्यांच्या नावामध्ये ऑक्सिजन आहे त्यांच्या शेअरचे भाव वधारले आहेत. बॉम्बे ऑक्सिजन कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. कंपनीचा शेअर मार्च महिन्यापर्यंत 10 हजार होता. यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. बीएसईमध्ये सोमवारी बॉम्बे ऑक्सिजन इन्वेस्टमेंटस लि. चा शेअर 24 हजार 574.85 रुपयांपर्यंत पोहोचला. कंपनीचे शेअर नियंत्रणात असून त्याच्या लाभाची मर्यादा 5 टक्के पर्यंत असेल.
बॉम्बे ऑक्सिजन कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर त्या कंपनीची स्थापना 3 ऑक्टोबर 1960 झाल्याचा उल्लेख आहे. मात्र, 3 ऑक्टोबरला 2018 ला कंपनींचं नाव बदलून बॉम्बे इन्वेस्टमेंटस असे ठेवण्यात आलं. कंपनीनं त्यांचं औद्योगिक वापरासाठीच्या गॅसचं उत्पादन 2019 मध्येचं बंद केलं आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कंपनीच्या वेबसाईटमध्ये विरोधाभास आहे. कंपन आता ऑक्सिजनची निर्मिती करत नाही. ऑक्सिजन आणि औद्योगिक गॅस निर्मितीबाबत उल्लेख दिसतो.
बीएसईमध्ये या कंपनीची नोंदणी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून आहे. 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीचं उत्पन्न 33.79 कोटी रुपये होते तर त्यांना 31.69 कोटी रुपये फायदा झाला होता. कंपनीचं बाजारमूल्य 368 कोटी रुपये आहे. याशिवाय लिंडे इंडिया, भगवती ऑक्सिजन, नॅशनल ऑक्सिजन कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आढळली आहे. मात्र, या कंपन्या ऑक्सिजनची निर्मिती करत नाहीत.