मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेत उभी फूट पाडली. या 40 आमदारांसह अन्य 10 आमदार मिळून भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. बंडखोरी करायचीच होती तर समोर येऊन बोलायचं असाही आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. ज्या भाजपने शिवसेनेला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्या भाजपला जाऊन मिळणे कितपत योग्य हाही सवाल उपस्थित करण्यात आला. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही कधीही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाहीच आणि करणारही नाही असे वारंवार सांगितले आहे. दरम्यान त्यांच्या आजच्या गुरू पोर्णिमेच्या ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर माध्यमांसमोर आल्यावर आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाहीच आम्ही आनंद दिघे आणि शिवसेनेच्या शिकवणीवर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाऊ असे वारंवार सांगितले. दरम्यान त्यांनी आज गुरु पोर्णिमे निमीत्त ट्वीट केले आहे याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरे आणि धनुष्यबाणाचा कुठेही उल्लेख नसल्याने त्यांना उद्धव ठाकरेंसोबत धनुष्यबाणाचाही विसर पडला का? अशी चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन… अशा आशयाचे ट्वीट करत गुरु पोर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मागच्या दोन महिन्यांपूर्वी आलेल्या धर्मवीर चित्रपटातही गुरूपोर्णिमेचे महत्व उल्लेखनीय दाखवण्यात आले होते. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांना शोधत गुरूपोर्णिमेनिमीत्त गुरूंचे पाय पूजन करतानाचा सिन दाखवण्यात आला आहे.
मातेश्रीबाहेर मृत्यू झालेल्या वक्तीला मुख्यमंत्र्याकडून मदत
शिवसेना पक्षात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. याच दरम्यान, एक दुःखद घटना घडली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत मातोश्रीला गेलेल्या शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. या पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना 3 लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यातील 1 लाख रुपयांची मदत माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि साईनाथ तारे यांनी आज काळे कुटूंबियांना सुपूर्द केली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व देखील शिंदे यांनी स्वीकारले आहे.