अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. हिराकुमार नागोजी यांनी नुकतीच देवगिरी कल्याण आश्रमांतर्गत जळगाव कार्यालयाला भेट दिली .हाउसिंग सोसायटीचे रोझ गार्डन हॉलमध्ये झालेल्या ह्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना डी लिस्टिंग आणि वनवासी बंधूंच्या कार्यासंबंधी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी शाल श्रीफळ देवून त्यांचे स्वागत,प्रांतसचिव,डाॅ.मंदारजी म्हस्कर यांनी केले. कार्यक्रमाला चोपडा धरणगाव पारोळा अमळनेर एरंडोल तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यकर्त्यांचे शंका समाधानही त्यांनी उत्तमरीत्या केले. नंतर झालेल्या कार्यक्रमात जळगावचे आ. राजू भोळे उपस्थित होते. त्यांनीही कार्यकर्त्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले .याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री श्री गर्गे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजय ठाकरे , प्रांत खेल कुद आयाम प्रमुख किशोर पाटील, बाळासाहेब नाईक, अ.भा.वि.प.,,राष्ट्र सेविकासमितीच्या संगिता अट्रावलकर, श्रीहर्ष खाडीलकर ,समीर साने उपस्थित होते .त्यांचे स्वागत संघटनमंत्री विठ्ठल मॅकलवाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव ऍड.अंजली कुलकर्णी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सौ. साधना दामले यांनी दिला सौ अंजली धवसे यांनी गीत सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ कांचन साने ,सौ यामिनी निकुंभ ,सौ स्वाती लांडगे, सौ कविता चौधरी ,श्रीमती रेखा भावसार , सचिन कलभंडे , पियुष श्रावगी, राकेश मुंडले यांनी परिश्रम घेतले