गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरेंना अनेक धक्के सहन करावे लागत आहे. पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. बंडखोर आमदार बाहेर पडल्यानंतर त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरुन काढलं होतं. मात्र यावेळीही एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदाचा दावा केला होता. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानण्यात येतो आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय पारित करण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवालयानं याला मान्यता दिली आहे. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे आता भर गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आणि शिवसेनेते सुनील प्रभूंना दिलेलं मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं आहे.
काय म्हणाले अजय चौधरी?
उपाध्यक्षांनी माझ्या निवडीला मान्यता दिली होती. त्यामुळे हा निर्णय आम्हाला मान्य नाही. यापुढेही उच्च स्तरावर याची दखल घेतली जाईल. याविरोधीत कायदेशीर कारवाई केली जाईल.
पुन्हा एकनाथ शिंदे गट जिंकला..
महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील वादावर अभ्यास करून दिला मोठा निर्णय दिला आहे.
शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या व्हिप वॅारमध्ये अखेर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना विधिमंडळ गट नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना मान्यांत दिली आहे. तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसलां आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विधिमंडळ गट नेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनिल प्रभू यांची मान्यता विधिमंडळ सचिवालयाने रद्द केली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटातील आमदारांनाही विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप मानावा लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.