सेल्फी काढण्याच्या नांदात वालवादेवी धरणात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी पाच मुली व एक मुलगा असे सहा मित्र मैत्रिणी गेले होते. दरम्यान सेल्फी काढण्याच्या नांदात या ६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वालदेवी या परिसरात त्यांनी वाढदिवसाचा केक कापला, सेलिब्रेशन केलं. मात्र, सेल्फी काढत असतांना काही मुली वालदेवी धरणाच्या कडेला उभ्या राहिल्या. यावेळी त्यांचा पाय सटकला आणि पाण्यात तोल गेला. त्यामुळे त्या धरणात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी इतरांनी प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.