गुजरातचा राजस्थानवर ‘हल्लाबोल’, 5110 दिवसांनंतर आयपीएलमध्ये घडला इतिहास

जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला आहे. आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. याचसोबत आयपीएललला 5110 दिवसांनंतर पहिलीच आयपीएल खेळून जिंकणारी गुजरात पहिलीच टीम ठरली आहे. याआधी 1 जून 2008 साली आयपीएलच्या पहिल्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा विजय झाला होता.

राजस्थानने दिलेलं 131 रनचं आव्हान गुजरातने 18.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं. शुभमन गिलने 43 बॉलमध्ये नाबाद 45 रन केल्या, तर हार्दिक पांड्या 30 बॉलमध्ये 34 रन करून आऊट झाला. डेव्हिड मिलरने 19 बॉलमध्ये नाबाद 32 रन केले. राजस्थानकडून बोल्ट, कृष्णा आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 130 रनच करता आले. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याशिवाय साई किशोरला 2 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद शमी, यश दयाळ आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. राजस्थानकडून बटलरने सर्वाधिक 39 तर यशस्वी जयस्वालने 22 रन केले, या दोघांशिवाय राजस्थानच्या कोणत्याच खेळाडूला मोठा स्कोअर करता आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.