दानवेंची दबंगगिरी, झेंडा घेऊन फडणवीसांच्या गाडीसमोरची तरुणाला केलं बाजूला

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आज औरंगाबादमधील जल आक्रोश मोर्चामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीसमोर गर्दी झाली असताना दानवे यांनी चक्क झेंडा घेऊन तरुण आणि कार्यकर्त्यांना बाजूला केलं. त्यांचा हा दबंग अवतार पाहून कार्यकर्तेही अवाक् झाले.

औरंगाबाद पाणी प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पैठण गेटवरून सुरू झालेला मोर्चा हा पालिकेसमोर मोठ्या सभेत पार पडला. या मोर्चाला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, आमदार गिरीश महाजन यांच्यासह इतर नेते हजर होते.

देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते स्क्रॉर्पिओ गाडीतून मोर्चात सहभागी झाले होते. गाडी पुढे सरकत असताना अचानक कार्यकर्त्यांनी गाडीला गराडा घातला. त्यामुळे फडणवीस यांची गाडी काही केल्या पुढे सरकत नव्हती. तरुणांना आणि कार्यकर्त्यांना बाजूला होण्यास सांगितले पण कार्यकर्ते काही बाजूला होईना. मग काय रावसाहेब दानवे झेंडा घेऊन खाली उतरले. झेंड्याच्या दांड्याने दोन्ही बाजूची गर्दी हटवण्यास सुरुवात केली. दानवे यांनी अक्षरश: कार्यकर्त्यांना बाजूला लोटून फडणवीसांच्या गाडीला वाट करून दिली. यावेळी पोलीस सुद्धा हजर होते. दानवेंच्या या दबंगगिरीचा पोलिसांना फटका बसला, दानवे यांचा अवतार पाहून कार्यकर्तेही अवाक् झाले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . दरम्यान, पालिकेसमोर झालेल्या सभेत रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

‘हे सरकार महाविकास आघाडी आहे  पण या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार म्हणायचं. हे सरकार अमर अकबर ॲंथनी आहे.  यांनी राज्यातील एकही प्रश्न   सोडवत नाही. फक्त केंद्रावर खापर फोडतं हे सरकार जुम्मे के जुम्मे सरकार आहे, अशी खिल्ली दानवेंनी उडवली.

मंत्री जेलात आणि मुख्यमंत्री घरात आहे. माझं कुटुंब माझं जबाबदारी अशी हाक दिली. पण मुख्यमंत्री घरात आणि आम्ही दारात अशी अवस्था झाली. जबाबदारीपासून पळ काढणारे हे सरकार आहे, अशी टीकाही दानवेंनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.