रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे आणि त्याचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. केवळ त्याच्या फॅशन सेन्स आणि अभिनयासाठीच नाही तर रणवीर त्याच्या विनोदबुद्धी आणि विनोदी कमेंटसाठी देखील ओळखला जातो. अलीकडे, अभिनेत्याने उघड केलं आहे की, त्याने आधीच आपल्या मुलासाठी नावांची एक लांबलचक यादी तयार केली आहे. मात्र अद्याप तो उघड करू इच्छित नाही.
त्याचा आगामी चित्रपट स्त्री भ्रूणहत्या आणि लिंग भेदभाव या विषयाशी संबंधित आहे. अभिनेत्याला विचारण्यात आलं की, तो आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण पालक झाले तर तो त्याच्या मुलाचं नाव काय ठेवणार? रणवीरने लगेच सांगितलं की त्याला बाळाच्या नावांचं वेड आहे आणि हे जोडपं नावांची चर्चा करत असतं. अभिनेत्याने हे देखील उघड केलं की तो नावांबद्दल थोडा गुप्त आहे कारण त्याला लोकांनी ते चोरावं असं वाटत नाही.
काही दिवसांपूर्वी, या अभिनेत्याने त्याला मुलगा हवा की मुलगी या प्रश्नाचं उत्तर देऊन मन जिंकली. रणवीरने उत्तर दिलं की ही त्याला या बाबतीत निवड नाही. मुलगा किंवा मुलगी ही दीपिका आणि त्याच्यासाठी खरे आशीर्वाद असेल. दीपिका पदुकोणच्या प्रेग्नेंसीबद्दल अलीकडेच अफवा पसरल्या होत्या. परंतु या जोडप्याने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.