अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळेच या दिवशी भारतात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे आता अनेक कमोडिटी विश्लेषकांनी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आता सोने खरेदी करणे फायदेशीर ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
ब्रोकरेज फर्म अॕक्सिस सिक्युरिटीजने अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला असून, म्हटलं की यावेळी सोने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 1.5 टक्क्यांनी घसरून 50,992 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही 1.8 टक्क्यांनी घसरण झाली असून तो 63,200 रुपये प्रतिकिलोवर व्यवहार करत आहे.
LiveMint.com च्या वृत्तानुसार, अॕक्सिस सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की सहसा अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे भाव वाढतात, परंतु यावेळी ते उलट झाले आहे आणि किंमती खाली आल्या आहेत. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की यूएस फेड रिझर्व्हच्या कठोर भूमिकेमुळे सोन्याच्या किमती दबावाखाली आल्या आहेत. डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या भावावरही परिणाम झाला आहे. सोन्याचा भाव मार्चच्या उच्चांकी 55,600 रुपयांवरून झपाट्याने खाली आला आहे.
प्रीतम पटनायक, कमोडिटी हेड, एचएनआय आणि एनआरआय ऍक्विझिशन्स म्हणतात की सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. पटनायक म्हणतात की, असे मानले जात आहे की फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीत व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली जाऊ शकते. दोन दशकांतील एकाच वेळी झालेली ही सर्वात मोठी वाढ असेल. फेड रिझर्व्हने आपली भूमिका कडक केल्याच्या वृत्तामुळे सोन्याच्या किमती दबावाखाली आल्या आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे.
त्याचवेळी ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल म्हणतात की सोन्यात गुंतवणूक ही थोडा विचार करूनच करावी. फेड रिझर्व्हच्या व्याजदरातील बदल, भू-राजकीय अस्थिरता आणि अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीचा सोन्याच्या किमतींवर परिणाम होत राहील. त्यामुळे सध्या तरी सोन्यात सावधपणे गुंतवणूक करावी. मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांना मंदीच्या काळात चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
(Disclaimer: येथे व्यक्त केलेली मते स्टॉक ब्रोकरेज हाऊस आणि तज्ञांची आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणत्याहीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर कृपया प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या झालेल्या कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी sdnewsonline जबाबदार राहणार नाही.)