कोरोना काळात उद्योगांना ‘ब्रेक’ लागल्यानंतर जागतिक बाजारपेठा आणि अर्थव्यवस्थाही एकाएकी ठप्प झाल्या आहेत. भारतीय उद्योगांनाही कोरोनाची खीळ बसली. मात्र, या परिस्थितीतही सर्व नियमांचे पालन करत, या संकटाशी दोन हात करण्याचा निर्धार करा व आपल्या उद्योगाला कुठल्याही प्रकारचा ‘ब्रेक’ लागु न देता आत्मविश्वासाने सामोरे जा व यशस्वी उद्योजक व्हा असा मौलिक सल्ला रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेतील प्रमुख पाहूणे, उद्घाटक तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी सहभागी झालेल्या संशोधक, स्कॉलर विध्यार्थी व उद्योजकाना दिला.
जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर व इन्स्पिरा रिसर्च असोसिएशन यांच्या संयुक्त विध्यमानाने सातव्या एकदिवसीय ऑनलाईन आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. फ्युचर ऑफ बिजनेस मॅनेजमेट अँड इकॉनॉमिक्स या विषयांवर खानदेशात प्रथमच संपन्न झालेली परिषद ठरली. परिषदेत बोलताना मंडलेचा म्हणाले की, कोविडच्या आव्हानाचे रुपांतर संधीत करण्याचा निर्धार प्रत्येक उद्योजकाने केला पाहिजे व देशाचा तरुण ‘आत्मनिर्भर’ झाला, की आपला देशही लवकरात लवकर ‘आत्मनिर्भर’ होईल असे मत त्यांनी यावेळी वक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी रायसोनी इस्टीट्यूट विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी विविध उपक्रम राबवीत असते त्याचाच भाग म्हणून या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचा फायदा आपल्या भागातील विध्यार्थी व उद्योजकासहित देशविदेशातील विध्यार्थ्यानाही होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.