रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 152 धावाचं आव्हान आरसीबीने 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला.
बंगळुरुकडून युवा अनुज रावतने सर्वाधिक 66 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या 47 बॉलमध्ये त्याने 2 फोर आणि 6 खणखणीत सिक्स ठोकले. या शिवाय विराट कोहलीने 36 बॉलमध्ये 5 चौकारासंह 48 रन्सचं योगदान दिलं. मुंबईकडून जयदेव उनाडकट आणि डेवाल्ड ब्रेविस या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले. मुबंईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सने गमावून 151 धावा केल्या. सूर्यकुमारने सर्वाधिक 68 धावांची नाबाद खेळी केली.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन : प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, वनिंदु हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
मुंबई इंडियंसची ‘पलटण’ : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरोन पोलार्ड, रमनदीप सिंह, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह आणि बासिल थंपी.