भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी सोमय्यांनी जमा केलेला निधी हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘विक्रांत’ युद्धनौकेचा निधी लाटला, किरीट सोमय्या यांच्यावर राऊत यांचा गंभीर आरोप
सेव्ह विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी जमा केले. या कटाचे प्रमुख सूत्रधार देशद्रोही सोमय्याच आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यानी केला आहे. तर पुरावे द्या सोमय्यांचे राऊतांना आव्हान दिले. त्याचवेळी राऊत यांनी राज्यपाल कार्यालयाने जी माहिती दिली आहे, ती काय खोटी आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढणार आहेत. ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. निवृत्त युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी किरीट सोमय्य यांनी लोकांकडून निधी गोळा केला. मात्र हा निधी राजभवनात जमा केला नाही अशी तक्रार फिर्यादी बबन भोसले यांनी दाखल केली होती. त्याची दखल घेत किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.