कर्णधार रवींद्र जडेजा परीक्षेत नापास, पराभवानंतर फलंदाजांवर फोडलं खापर

चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या आयपीएलच्या आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 6 विकेटने दणदणीत विजय मिळवून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करून दिलेल्या 132 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताने 18.3 षटकांत जोरदार विजय मिळवला. या पराभवानंतर कर्णधार जडेजाने नाराजी व्यक्त केली आहे.

सामन्यानंतर जडेजा म्हणाला, दव फॅक्टर महत्त्वाचा होता आणि त्यामुळेच नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही प्रथम गोलंदाजी करणे पसंत करता. पहिली सहा षटकं खेळणे अवघड होते, दुसऱ्या टप्प्यात आम्ही खेळ सावरण्याचा प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहण्याचा प्रयत्न केला. ड्वेन ब्राव्होने उत्तम गोलंदाजी केली आणि अन्य गोलंदाजांनीही त्यांची कामगिरी चोख बजावली. पण, फलंदाजीत आम्ही भागीदारी करू शकलो नाही. पुढील सामन्यात त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. असा विश्वास जडेजाने यावेळी व्यक्त केला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक 200 सामने खेळल्यानंतर कर्णधार बनलेला रवींद्र जडेजा हा पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी मनिष पांडेने 153सामने खेळल्यानंतर कर्णधारपद भूषविले होते. किरॉन पोलार्डलाही कर्णधार बनण्यासाठी 137, आर अश्विनला 111, संजू सॅमसनला 107 व भुवनेश्वर कुमारला 103 सामने खेळावे लागले.

सीएसकेने दिलेल्या 132 रनचं आव्हान केकेआरने 18.3 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकात्याची सुरूवात चांगली झाली. अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी टीमला 6.2 ओव्हरमध्ये 43 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली.

रहाणेने 34 बॉलमध्ये सर्वाधिक 44 रन केले. सॅम बिलिंग्सने 25 रनची खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यर 20 रनवर नाबाद राहिला. सीएसकेकडून ड्वॅन ब्राव्होने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर मिचेल सॅन्टनरला एक विकेट घेण्यात यश आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.