तर तो माझा शेवटचा क्षण असेल : पंकजा मुंडे

माझ्या सत्ताकाळात एकही माणूस माझ्यापासून दुरावला नाही. चांगल काम केले पाहिजे, करुन घेतले पाहिजे. संघर्षाला तयार राहिले पाहिजे. माझे ऑपरेशन झाले. बोलायला घसा दुखतोय आणि बीडच्या बदनामीचं माझ्यावर खापर फोडलं जातंय. माझ्यावर आरोप करताय की पंकजा मुंडेनी जिल्ह्याची बदनामी केली. मी कधी बदनामी सारखे काम केले का? तसे काम केले तर तो माझा शेवटचा क्षण असेल, असा पलटवार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला.

धनजंय मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या बदनामीला पंकजा यांना जबाबदार धरलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. बीड येथील शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पंकजा यांनी आघाडी सरकारवरही चौफेर हल्ला चढवला.

लोक आज माझ्या आणि प्रीतम यांच्या नावाने आपल्या मुलींची नावे ठेवतात. लोक आपल्या मुलांचे नाव ठेवताना आमचा चेहरा समोर आणून ठेवतात. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपले सरकार येणारच आहे. लोक घरी आणून मत देतील असे काम विरोधकांनी केले. एवढे वाईट काम या सरकारमधील लोकांनी केले आहे, असंही त्या म्हणाल्या.
जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. माझ्याकडे कोणतेही फार्म हाऊस नाही. मोठे ऑफिस नाही. राजकारणात ज्यांचा अहंकार जास्त होतो त्याचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही, अशी टीकाही त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केली.

महिला सत्संगाला जातात. मी पण सत्संग ऐकते. मी रामकथा ऐकल्या. त्यात चांगल्या लोकांना त्रास होतो. ज्याला वनवास, त्रास आहे, त्यालाच इतिहास रचायला मिळतो. माझा संघर्ष स्वतःसाठी नव्हता केवळ प्रवृत्ती बदलण्यासाठी होता. मोदींच्या नेतृत्त्वात सायकलवरुन जाणाऱ्या नेत्यांना मंत्री केले. मी जिल्हा परिषद एवढी मोठी केली पण एकतर काम आजच्या सत्ताधाऱ्यांनी केले का?, असा टोलाही त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.