पत्रकार परिषदेत बोलत असताना निलेश राणे यांनी शरद पवार दादऊचा माणूस आहेत की काय, अशी शंका उपस्थित केली आहे. ईडीनं अटक केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारनं नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यावर निलेश राणे यांना प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना निलेश राणेंनी हे विधान केलंय. मलिकांकडून राज्य सरकारनं मंत्रिपदाचा राजीनामा का घेतलेला नाही, यावर नितेश राणे बोलत होते. नवाब मलिक हे पवारांचे खास आहेत, असं नितेश राणे यांनी म्हटलंय. ‘अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा.
नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे,ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल परबांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?’ असा सवाल निलेश राणे यांनी विचारलाय.
दरम्यान, फक्त शरद पवारच नव्हे, तर सुप्रिया सुळे यांच्यावरही निलेश राणे यांनी टीका केली आहे. नवाब यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जेवढी तत्परता दाखवली, तेवढीच काळजी अनिल देखमुखांच्या वेळी कुठे होती? असा सवालही निलेश यांनी उपस्थित केलाय.
नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र भाजपच्या मागणीला महाविकास आघाडी सरकारनं केराची टोपली दाखवल्यामुळे राजकारण तापलंय. नवाब मलिकांचा राजीनामा सरकारनं घ्यावा यामागणीसाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हल्लाबोल केला होता. या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाचा आता नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरुनही वाद पेटण्याची शक्यता आहे.
ओबीसी आरक्षणाच्या विषयावर निलेश राणे यांनी सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. मात्र निवडुणका वेळेत घेतल्या जाव्यात, त्याला उशीर होणार नाही, याचीही काळजीही सरकारनं घ्यावी, असा सल्लाही दिलाय.