प्रवाशांनीच रेल्वे गाडीला रुळावर आणण्यासाठी दिला धक्का

एकीच्या बळाची गोष्ट तर प्रत्येकानं ऐकली असेलच. पुन्हा एकदा एकीचं बळ काय असतं आणि कोणत्याही आणि कितीही मोठं संकट आलं तरी त्यावर मात करता येते हे सांगणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रवासी आणि लोक ट्रेनला धक्का मारत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की लोक ट्रेनला धक्का मारत आहेत. शनिवारी मेरठमध्ये पॅसेंजर ट्रेनला मोठी आग लागली होती. यामध्ये 3 डब्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्याच वेळी ही आग वाढू नये म्हणून ट्रेनपासून 3 डबे वेगळे करण्यात आले होते.

तीन डबे वेगळे केल्यानंतर प्रवासी आणि लोकांनी ही ट्रेन पुढे धक्का देऊन प्लॅटफॉर्मपर्यंत आणली. हा व्हिडीओ दीपांशू काबरा यांनी ट्वीट करत एकीचं बळ काय असतं याचं उदाहरण दिलं आहे. त्यांच्या भावना, मदत करण्याची वृत्ती आणि एकजुटीचं बळ काय असतं याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं असल्याचं म्हटलं आहे.

45 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 13 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. गाडीच्या डब्यांना धक्का मारणं ही साधी गोष्ट नाही. यासाठी अनेक प्रवासी-लोक एकत्र येऊन काम करण्याची गरज होती ते या लोकांनी करून दाखवलं. शनिवारी पॅसेंजर ट्रेनला आग लागल्याची घटना समोर आली होती. त्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.