व्लादिमिर पुतिन यांची युक्रेनमध्ये
लष्करी कारवाई करण्याची घोषणा
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करणार. या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगितलं. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पाडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.
रशियाची सहा विमानं, एक
हेलिकॉप्टर आम्ही पाडले : युक्रेन
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रशियाला जशाच तसं उत्तर दिल्याचा दावा केलाय. रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर आम्ही पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय. युक्रेनमधील लुहान्स प्रांतामध्ये आम्ही ही विमानं पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय. लुहान्स्क हा युक्रेनमधील बंडखोर प्रांतांपैकी एक आहे. याच आठवड्यामध्येच रशियाने लुहान्स्कला वेगळा देश म्हणून घोषित केलं आहे. रशियन लष्कराने युक्रेनकडून करण्यात आलेला हवाई हल्ला आम्ही हाणून पाडल्याचा दावा केलाय. युक्रेनच्या उत्तरेकडून रशियाने हल्ला केला असून रशियन सैन्य युक्रेनच्या भूप्रदेशात शिरलं आहे. ब्रुसेल्समधूनही रशियाने युक्रेनवर हल्ला चढवलाय.
भारताने मध्यस्थी करावी : युक्रेनचे
भारतातील राजदूत इगोर पोलिखा
युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी यासाठी विनंती करणार आहेत. “भारताचे रशियासोबत चांगले संबंध असून नवी दिल्ली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका निभाऊ शकतं. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तात्काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन तसंच आमचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत संपर्क साधण्याची विनंती करणार आहोत,” असं ते म्हणाले आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मॉस्कोच्या सुरक्षा चिंतेचे कितीही कौतुक केले जात असले तरी युद्धाचा अवलंब करणं अशक्य आहे. भारताने रशियाला थांबण्यास सांगितलं पाहिजे असं म्हटलं आहे.
नवाब मलिकांचे भाऊ कप्तान
मलिक यांना ईडीचे समन्स
आता नवाब मलिक यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने समन्स बजावले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, नवाब मलिकांना अटक केल्यानंतर ईडीने कप्तान मलिक यांना समन्स जारी केले आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्डिरग प्रकरणी ईडीने नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे, असे एएनआयने म्हटले आहे. कप्तान मलिक यांनी हा दावा फेटाळला आहे.
ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार
नाही याची काळजी घ्या : राजू शेट्टी
नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर राजू शेट्टी यांनी अजित पवारांना इशारा देत ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या असे म्हटले आहे. राजू शेट्टी यांनी एक फोटो ट्विट केला असून त्यामध्ये ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी नाही- अजित पवार, उपमुख्यमंत्री असे म्हटले आहे. त्यावर राजू शेट्टी यांनी, “एवढा अहंकार बरा नव्हे ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या,” असे म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी महावितरणाच्या
कार्यालयाला आग लावली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले. कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेची मदत घेत आग आटोक्यात आणण्यात आली.
बारावी परीक्षेच्या प्रश्न
पत्रिका आगीत जळून खाक
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या प्रश्न पत्रिकांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्यामुळे या वाहनासोबतच संपूर्ण प्रश्नपत्रिकाही जळून खाक झाल्या. दहाच दिवसांवर परीक्षा असल्याने या प्रश्नपत्रिका शिक्षण मंडळाला पुन्हा तातडीने छापाव्या लागणार आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ चंदनापुरी घाटात बुधवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी प्रश्नपत्रिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बारावी परीक्षेबाबत नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
लाल कांद्याची निर्यात
24 टक्क्यांनी घसरली
सध्या बाजारपेठेत आवक होत असलेला कांदा हा साठवणूकीतला किंवा खरीप हंगामातलाच आहे. असे असतानाही देशातून कांदा निर्यात ही अत्यल्प प्रमाणात सुरु आहे. कारण लाल कांदा हा निर्याती योग्य नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या निर्यातीमध्ये 10 लाख 55 हजार टनाची घसरण झाली आहे. कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत कांद्याची निर्यात 24 टक्क्यांनी घसरली आहे.
रशिया आणि युक्रेन वादाचा
बियर उद्योगावर परिणाम
उन्हाळा सुरू झाला आहे. भारतामध्ये उन्ह्याळ्यात बियरला मोठ्याप्रमाणात मागणी असते. त्यामुळे या काळात बियरच्या विक्रीत वाढ होते. उन्हाळ्यामध्ये बियर कंपन्यांकडून आपल्या उत्पादनात वाढ केली जाते. मात्र यंदा चित्र थोड प्रतिकुल असल्याचे पहायला मिळत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला वाद हे आहे. ज्याप्रमाणे रशिया, युक्रेन वादाचा परिणाम हा पेट्रोल, डिझेल आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आहे. त्याचप्रमाणे तो बियरच्या उत्पादनावर देखील झाला आहे. बियर बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून गहू आणि बार्ली यांचा उपयोग केला जातो. रशिया आणि युक्रेन हे देश जगातील प्रमुख गहू उत्पादक आहेत. रशिया जगातिक दुसऱ्या क्रमांकाचा गव्हाचा निर्यातदार देश आहे.
विजय मल्ल्या, नीरव मोदी,
चोक्सीकडून 18 हजार कोटी वसूल
देशातील विविध बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात धूम ठोकणारा मद्यसम्राट आणि कुख्यात उद्योजक विजय मल्ल्या कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्याकडून 18 हजार कोटी रुपये वसुल करण्यात आले आहेत. ही रक्कम बँकांना परत करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. विजय मल्ल्याने बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे.
SD social media
9850 60 35 90