संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना सामना रंगला आहे. जुन्हा संघर्ष पुन्हा ताजा झाला आहे. नारायण राणेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची कुंडली मांडली. तर लगेच शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत घेत विनायक राऊतांनी राणेंचा इतिहास आणि लायकी काढली. त्यात मिलींद नार्वेकरांचे ट्विटही आले. मिलींद नार्वेकरांच्या ट्विटला लगेच नारायण राणेंनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले. आता माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. विनायक राउत यांचा इतिहास कच्चा आहे.आमच्या विरोधात अशोक चव्हाण चुकीची फिडींग दिल्लीत लावत होते, म्हणून कंटाळून आम्ही काँग्रेस सोडली. अशोक चव्हाण तेव्हा तसे वागले नसते. तर तो निर्णय घेतला नसता, असे निलेश राणे म्हणाले आहेत. तर त्यांनी मिलींद नार्वेकरांना तिकीटं विकणार एजंट आहे म्हणत खिल्ली उडवली आहे.
आमच्यावर कोणती कारवाई होती विनायक राउत यांनी सांगावं, नाहीतर राजकारण सोडावं. ते पुराव्याच्या आधारावर कधी बोलत नाहीत. शिवसेनेत तिकिट वाचवण्यासाठी ते आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे. नेते पद नव्हत तरी त्यांना राणे साहेबांनी बाळासाहेबांना मुख्यमंत्री केलं ना. विनायक राऊतांना साधे मंत्रीही नाही केलं. राणे साहेबांच काय वजन आहे शिवसेनेत ते 2005 साली आणि त्या आधीच दाखवलं आहे. विनायक राउत यांनी स्वःतच वजन बघावं, असा टोला त्यांनी लगावला आहे.
नारायण राणेंची नेता व्हायची लायकी नव्हती म्हणून बाळासाहेबांनी त्यांना नेतेपद दिलं नाही. संजय राऊतांना बाळासाहेबांनी नेते बनवलं होतं. अशी टीका काही वेळापूर्वीच विनायक राऊत यांनी केली होती. त्यालाच निलेश राणे यांनी जोरादार प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच मिलींद नार्वेकर यांच्यावरही निलेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर यांना बसायला जागा नसायची.ते मागे उभे असायचे. शिवसेनेत तिकिट विकणारा जर कोण एजंट असेल तर तो मिलिंद नार्वेकर, अशा शब्दात त्यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे.
तसेच नारायण राणे यांनी मिलींद नार्वेकरांना फोन केल्याच्या ट्विटला उत्तर देताना, साहेबांनी फोन केलाही असेल तर काय अडचण आहे का? उद्धव ठाकरे हे काय़ पाकिस्तानचे आहेत का? फोन करण्यात काय चुकलं? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मेन कलाकार बघून घेतील, हे साईड अॕक्टरचे काम नाही, असा टोलाही त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे.