करोना लसीमुळे
२१ आजारांपासून संरक्षण
करोना लस हेच करोनावरील परिणामकारक उत्तर आहे असं जाणकार सांगत आहेत. मात्र, आता करोना लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) महत्त्वाची माहिती दिलीय. करोना लसीमुळे केवळ करोनापासूनच नाही, तर एकूण २१ आजारांपासून संरक्षण मिळतं. त्यामुळे करोना लस घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. व्हॅक्सिन्स वर्क या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने संरक्षण होणाऱ्या २० पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केलीय
गांधीजींची हत्या सावरकर यांच्या
नेतृत्वाखाली झाल्याचा दावा
स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या महात्मा गांधी यांच्या हत्येचा खटला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेचा विषय आहे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या पत्राच्या संदर्भामुळे. राजकमल प्रकाशनाच्या आणि लेखक अशोक कुमार पांडेय लिखित ‘सावरकर –काला पानी और उसके बाद’ या पुस्तकात सरदार पटेल यांनी नेहरूंना गांधींच्या हत्येचा कट विनायक दामोदर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं पत्र लिहिल्याचा दावा केला आहे.
लता मंगेशकर उपचारांना
उत्तम प्रतिसाद देत आहेत : राजेश टोपे
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, “लतादीदी सतत डोळे उघडत असून आजूबाजूला बघत आहेत, त्यांची तब्येत आधीपेक्षा बरीच सुधारली आहे. मी लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो. त्या बऱ्या होत आहेत. त्या काही काळ व्हेंटिलेटरवर होत्या पण आता नाही. १५ दिवसांच्या उपचारानंतर त्या व्हेंटिलेटरवर नाही. त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. त्या डोळे उघडत आहे, तसेच डॉक्टरांशी देखील बोलत आहे. त्यांना अशक्तपणा असून संसर्ग देखील आहे. त्या डॉक्टरांच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असून त्या आता बऱ्या आहेत.”
फेब्रुवारी महिन्यात बँकांना
७ दिवस सुट्टी राहणार
बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात ७ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे.
मर्दानगी होती, तर, जिनांना
का मारलं नाही : संजय राऊत
आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. राहुल गांधींनी ट्वीट करत आजच्याच दिवशी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली होती, असं म्हटलंय. यावर बोलताना राऊत म्हणाले, की गोडसे जर खरा हिंदुत्ववादी असता तर जिनाला गोळी मारली असती. गांधींना का गोळी मारली. पाकिस्तानची मागणी तर जिनांनी केली होती. असं ते म्हणाले. “मर्दानगी होती, तर गांधींना का मारलं, जिनांना का मारलं नाही, असा सवाल राऊतांनी केला. वेगळ्या पाकिस्तानची मागणी जिनांनी केली होती. गोळी मारणारा खरा हिंदुत्वावादी होता आणि त्याच्यात हिम्मत होती, तर फाळणीला कारणीभूत असलेल्या जिनांवर गोळी झाडायला हवी होती, नि:शस्त्र गांधींवर का गोळी झाडण्यात आली.
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात,
पाच जण जागीच ठार
मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्येएका कारचा चुराडा झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शिलाटणे गावाजवळ ही घटना घडली. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कारचालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं.
कोलंबियात सुरू झाले
पॉर्न प्रशिक्षणाचे विद्यापीठ
पॉर्न फिल्म्सच्या व्यवसायात यश कसं मिळवायचं याच्या प्रयत्नात असणाऱ्या कलाकारांसाठी कोलंबियातल्या एका पॉर्नस्टारने चक्क पॉर्नचं विद्यापीठ सुरू केलं आहे. अलेक्झांड्रा ओमाना रुईझ, असं पॉर्नस्टारचं नाव असून ती अमरान्ता हँक या नावाने पॉर्न इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तिने मेडेलिनमध्ये आपलं विद्यापीठ सुरू केलं असून तिथं ती वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रही भरवणार आहे, ज्यात प्रात्यक्षिकही दाखवलं जाणार आहे. डेलिमेल या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, द सीक्रेट गार्डन एरॉटिक पब याठिकाणी वर्ग भरणार आहेत. याच ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं.
भारताच्या युवा संघाचा दिमाखात
वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत प्रवेश
भारताच्या युवा संघाने दिमाखात अंडर 19 वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. काल अँटिंग्वा येथे झालेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात युवा टीम इंडियाने बांगलादेशवर 115 चेंडू आणि पाच गडी राखून विजय मिळवला. गतविजेत्या बांगलादेशला नमवून युवा टीम इंडियाने दोन वर्षांपूर्वी अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
दोन ते चार दिवसांत थंडीची
लाट कमी होण्याची शक्यता
थंडीशी संबंधित दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या दोन ते चार दिवसांत थंडीची लाट आणि थंडी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. यासंदर्भातील अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.
देशातील पहिलं ड्रोन स्कूल
मार्च महिन्यापासून सुरू होणार
ड्रोन उडवण्यासाठी परवानगी लागते. मात्र चक्क देशात ड्रोन स्कूल तयार करण्यात आली आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे आणि कोणत्या राज्यात सुरू झाली आहे त्याबद्दल जाणून घेऊया. ड्रोन स्कूल म्हटलं की उत्सुकता अधिक वाढते. देशातील पहिलं ड्रोन स्कूल मार्च महिन्यापासून सुरू होत आहे. MITS कॉलेजमध्ये ड्रोन स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
SD social media
9850 60 35 90