जन्म. २९ मार्च १९७८ गिरगांव.
भार्गवी चिरमुलेने मराठी चित्रपट व मालिका यातुन आपल्या अभिनयाचा स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे. भार्गवीचे शालेय शिक्षण राजा शिवाजी विद्यालयातुन तर महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल कॉलेज येथुन पुर्ण केले. भार्गवीने भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारचे रितसर प्रशिक्षण घेतलेले आहे. रुपारेल कॉलेजला शिकत असतांना नाटकांमधुन तिने अभिनय केलेला आहे. पुढे विश्वविनायक या चित्रपटातुन तिला मोठ्या पडद्यावर झळकण्याची प्रथम संधी मिळाली. सचिन, महेश कोठारे व अशोक सराफ या सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर आयडीयाची कल्पना या चित्रपटातुन अभिनय करण्याची तिला नामी संधी मिळाली. भार्गवीने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात नाटकांतून केली. ग्रॅज्युएशनमध्ये असतानाच कॉलेजमध्ये तिने नाटकांत भाग घेतला. विश्व विनायक या मराठी चित्रपटात तिला पहिला ब्रेक मिळाला. आणि स्वत:ची तशी ओळख निर्माण करण्यात ती यशस्वी देखील ठरली आहे. कस, वन रुम किचन या चित्रपटांतुन गंभीर भुमिका समर्थपणे साकारल्यानंतर फु बाई फु मधुन कौमेडीही तितक्याच ताकदीने केलेली आहे. यातुन एक अभिनेत्री म्हणुन तिची उंची लक्षात येते. वैविध्यपुर्ण भुमिका, अभिनयातील विविधता यामुळे आज ती प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली आहे. एकापेक्षा एक या रिअॅलिटी शो मधुन ती विजेती ठरलेली असुन पुढे याच शो च्या ‘अप्सरा आली’ या पर्वाच्या एका एपिसोडमधे पाहुणी परिक्षक म्हणुन तिने सहभाग नोंदवलेला आहे. हिमालयाची सावली, झोपी गेलेला जागा झाला या नाटकांबरोबरच ओली की सुकी, संदूक, इश्क़वाला लव, सासुचं स्वयंवर, शर्यत, नवरा माझा भवरा, गोळाबेरीज, महागुरु, धागेदोरे,काही क्षण प्रेमाचे या सारख्या चित्रपटांतुन भार्गवीने भुमिका केलेल्या आहेत. स्टारप्रवाह वाहिनीवरील सुवासिनी व स्टारप्लस वाहिनीवरील सिया के राम या मालिकांमधुन काम केले आहे. वहिनीसाहेब, चार दिवस सासुचे, अनुबंध, असंभव, पिंजरा, श्रीमंत गंगाधर पंत, फु बाई फु, अनुपर्णा, होम मिनिस्टर, भाग्यविधाता, प्रपंच, रक्तासंबंध या सारख्या मालिका तसेच टिव्ही शोज मधुन ती चमकलेली आहे. अभिनयाबरोबरच भार्गवी एक योगा चिकित्सक देखील आहे. चैत्राली ही तिची बहिण देखील एक अभिनेत्री असुन लोकेश गुप्ते यांचेशी विवाहबध्द झालेली आहे. भार्गवीला आपल्या समुहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.