औरंगजेब आला, तर शिवाजी
देखील उभे राहतात : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. या ठिकाणी औरंगजेब आला, तर शिवाजी देखील उभे राहतात, असं मत मोदींनी व्यक्त केलं. याशिवाय मोदींनी अनेक भारतीय पराक्रमांचाही उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “आक्रमण करणाऱ्यांनी या नगरीवर हल्ले केले आणि उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात. त्याने तलवारीच्या बळावर येथे बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे.
२१ वर्षांनंतर भारताला मिळाला
मिस युनिव्हर्सचा खिताब
मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ संधूनं जिंकलाय. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे. तिच्या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. हरनाझच्या विजयाची बातमी ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली.
धर्माच्या आधारावर भारताची फाळणी
करणं, ही ऐतिहासिक चूक
धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करणं, ही ऐतिहासिक चूक होती, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. सशस्त्र दलांच्या योगदानाचे स्मरण करणार्या ‘स्वर्णिम विजय पर्व’च्या उद्घाटनावेळी रक्षा मंत्री सिंह यांनी हे वक्तव्य केलं. नवी दिल्लीतील इंडिया गेट लॉन्स येथे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “१९७१चं युद्ध आपल्याला हेच सांगते की धर्माच्या आधारावर भारताची फाळणी ही ऐतिहासिक चूक होती. पाकिस्तानचा जन्म एका धर्माच्या नावावर झाला पण तो एकच राहू शकला नाही.”
जातीपातीच्या राजकारणातचं महाराष्ट्र
खितपत पडावा असं अनेकांना वाटतंय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे पत्रकारपरिषदेत बोलताना मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे. “अनेकांना जातीपातीच्या राजकारणातचं महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण आहे” असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे म्हणाले, “एकदम अचानक हा ओबीसीचा विषय आला कसा? मग ते केंद्र सरकारने यांना मोजणी करायला कशी काय सांगितली. मग कोर्टात याविरोधात कसा काय निर्णय आला? हे काही इतकं दिसतं तेवढं सरळ नाही प्रकरण.
शरद पवार यांनी देशाचे
नेतृत्त्व करावे : अमोल कोल्हे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचा काँग्रेसतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे असा सूर उमटला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांनी देशाचे नेतृत्त्व करावे जर गुजरातमध्ये २६ खासदार असताना पंतप्रधानपदी व्यक्ती विराजमान होऊ शकते मग ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातून शरद पवार सुद्धा विराजमान होऊ शकतात असे म्हटले.
दुबई सरकार जगातील पहिलं
पेपरलेस सरकार ठरलं
दुबई सरकार जगातील पहिलं पेपरलेस सरकार ठरलं आहे. यामुळे ३५ कोटी अमेरिकन डॉलर्स आणि १४ कोटी तासांची बचत होणार असल्याचं अमीरातचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मुहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी सांगतिलं आहे. दुबईमध्ये पेपरलेस योजना सलग पाच टप्प्यांत राबविण्यात आली. प्रत्येक टप्प्यात सरकारच्या विविध गटांचा समावेश करण्यात आला होता. शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यात अमिरातीमधील सर्व ४५ सरकारी विभागांमध्ये ही योजना लागू करण्यात आली. या विभागात १,८०० डिजिटल सेवा आणि १०,५०० पेक्षा जास्त व्यवहार होत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर
अभाविपच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परिणामी, म्हाडाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. पेपरफुटी प्रकरणी परीक्षा रद्द झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सोमवारी निदर्शने केली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भारतीय रेल्वे लवकरच प्रीमियम
ट्रेन्समध्ये ट्रेन होस्टेस सुविधा पुरवणार
भारतीय रेल्वे लवकरच प्रीमियम ट्रेन्समध्ये ट्रेन होस्टेस सुविधा पुरवणार आहे. सुरुवातीला ही सुविधा वंदे भारत एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेससारख्या ट्रेनमध्ये पुरवली जाईल. राजधानी आणि दुरंतो एक्सप्रेस सारख्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सध्या ही सुविधा उपलब्ध नसेल
निवडणुका पुढे ढकलण्याचा
अधिकार संविधानात नाही
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकारपरिषद घेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची राजद आणि इंडियन यूनियन मुस्लीम लीगसोबत आघाडी झाली असल्याचं जाहीर केलं. याचबरोबर, यावेळी त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही, असं म्हणत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय जे काही करत आहे ते एकादृष्टीने घटनाविरोधी असल्याचंही बोलून दाखवलं.
चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ
चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.
SD social media
9850 60 3590