बोनी कपूर श्रीदेवी यांची लव्ह स्टोरी जाणून घ्या

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1955 रोजी झाला. बोनी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला ‘मिस्टर इंडिया’, ‘नो एंट्री’, ‘जुदाई’ आणि ‘वॉन्टेड’सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बोनी कपूर यांनी 1980 मध्ये पहिला चित्रपट ‘हम पांच’ बनवला होता. त्यांनी भाऊ अनिल कपूर आणि संजय कपूर यांना त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये कास्ट केले होते. आता त्यांचा मुलगा अर्जुन कपूर चित्रपटांमध्ये चमक दाखवत आहे. बोनी आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे आणि ती एकापाठोपाठ एक हिट चित्रपट करत आहे.

बोनी कपूर यांचे पहिले लग्न मोना शौरी कपूरसोबत झाले होते. मोना आणि बोनी यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुले आहेत. मोनापासून घटस्फोट घेतल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न केले. श्रीदेवी आणि बोनी यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. बोनी यांनी 1996 मध्ये श्रीदेवीशी लग्न केले. त्यावेळी श्रीदेवी गरोदर होत्या, असे सांगितले जाते.

लेकीला चित्रपटात घेण्यासाठी आईची मदत घेतली!
बोनी आणि श्रीदेवी यांची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे. बोनी कपूर यांनी यापूर्वीच श्रीदेवीला प्रपोज केले होते, पण त्यावेळी श्रीदेवीने त्यांना भाव दिला नव्हता. त्यावेळी बोनी कपूर यांनी आपला धाकटा भाऊ अनिल कपूरसोबत ‘मिस्टर इंडिया’ चित्रपट करत होते. त्यांना या चित्रपटात श्रीदेवीला घ्यायचे होते. पण त्यांना तिच्यापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता.

अशावेळी बोनी श्रीदेवीच्या आईजवळ गेले. श्रीदेवीच्या आईने चित्रपटासाठी आणखी पैशांची मागणी केली होती. बोनी कपूर फीसाठी सहमत झाले आणि अशा प्रकारे श्रीदेवीने या चित्रपटात काम केले. एक वेळ अशी आली की, श्रीदेवी यांची आई आजारी पडली आणि तिच्यावर दीर्घ उपचार करावे लागले होते. बोनी यांनी त्या कठीण काळात श्रीदेवीला खूप साथ दिली.

असे म्हटले जाते की, श्रीदेवीच्या आईच्या आजारपणात आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू यादरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. अशा प्रकारे त्यांचे नाते सहानुभूतीने सुरू झाले आणि प्रेमात बदलले. आपल्या वयापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेल्या श्रीदेवीला बोनी कपूर यांनी प्रपोज केले होते. दोघांनी अगदी खाजगी पद्धतीने लग्न केले होते. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला. बोनी आता आपल्या दोन मुलींसोबत म्हणजे ख़ुशी आणि जान्हवीसोबत राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.