शांतीचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफजई हिचा निकाह नुकताच पार पडला. मंगळवारी तिनं असर मलिक याच्यासोबत आपल्या जीवनाची एक नवी सुरुवात केली. ट्विट करत मलालानं तिच्या जीवनातील या नव्या प्रवासाची माहिती सर्वांनाच दिली.
मलाला आणि असरच्या या निकाहसाठी दोघांच्याही कुटुंबीयांची उपस्थिती होती. ट्विट करत या आनंदी क्षणाबाबत सांगताना मलालानं लिहिलं, ‘आजचा दिवस माझ्या जीवनातील एक अद्वितीय दिवस आहे. असर आणि मी एकदुसऱ्याची साथ देण्यासाठी या बंधनात अडकलो आहोत.’
मलाला आणि असरचा निकाह त्यांच्याच बर्मिंघममधील निवासस्थानी पारस पडला. येत्या काळातील सर्वच क्षणांसाठी आपण उत्सुक असल्याचं मलाला ट्विटच्या माध्यमातून म्हणाली.
मलालाचा पती, असर मलिक हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मॅनेजर पदावर काम करतो. याआधी तो पाकिस्तान सुपर लीगसाठी काम करत होता. एका प्लेअर मॅनेजमेंट कंपनीचं संचालनही त्यानं केलं आहे. लाहोर युनिवर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेजमधून त्यान 2012 ला अर्थशास्त्र आणि पॉलिटीकल सायन्समधून पदवी घेतली आहे.