पंजाब सरकार 36,000 कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करणार

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाब सरकारने जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारच्या विविध विभागात अस्थाई स्वरुपात जे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय चन्नी सरकारने घेतला आहे. राज्य सरकारचा हा एक मोठा निर्णय असून, याचा फायदा पंजाबमधील जवळपास 36,000 कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मुखमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये अस्थाई स्वरुपात काम करणाऱ्या नोकरदारांच्या नोकऱ्या कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पंजाब प्रोटेक्शन अ‍ॅण्ड रेगुलराइजेशन ऑफ कॉन्ट्रॅक्चुअल एम्प्लॉइज बिल-2021 पास करण्यात आले आहे. आता हे विधेयक मान्यतेसाठी विधानसेभेत सादर केले जाणार आहे.

य निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री चन्नी यांनी पत्रकारांना सांगितले की, ही एक चांगली योजना आहे. या योजनेतंर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विविध भागात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिली आहे. त्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 36,000 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

या विधेयकाला मंजुरी देण्यासोबतच पंजाब सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. किमान वेतनामध्ये 415.89 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंजाबमध्ये किमान वेतन हे 8776.83 रुपये इतके आहे. आता त्यामध्ये वाढ करून ते, 9192.72 रुपये करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने पंजाबमध्ये विविध लोकप्रिय योजनांचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने पेट्रोल, आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पेट्रोलच्या किमती 5 रुपये तर डिझेलच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्यात आल्या. त्यापूर्वीच विजेच्या दरामध्ये देखील कपात करण्यात आली होती. आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला याचा फायदा होणार असल्याचे पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.