कृषी मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
राज्यात सर्वत्र अतिवृष्टीने घातलेल्या थैमानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी सणासुदीच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ‘ कडू’ होत असतांना मंत्र्यांची दिवाळी ‘ गोड ‘ होऊ द्यायची नाही, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपच्या
खासदाराची गाडी फोडली
भाजपा राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांना आज(शुक्रवार) आंदोलक शेतकऱ्यांचा रोषाला सामोरं जावं लागलं. शेतकऱ्यांच्या एक गटाने हरियाणामधील हिस्सार जिल्ह्यात खासदार जांगडा हे एका धर्मशाळेच्या उद्घाटनासाठी आले असात त्यांना काळे झेंडे दाखवले गेले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस व आंदोलकांमध्ये झडप झाली, शिवाय खासदार जांगडा यांच्या कारची काचही देखील फोडली.
करोना संसर्गाबाबत युरोप
जगाचे मुख्य केंद्र होऊ शकतं
करोना संसर्गाबाबत युरोप हे पुन्हा एकदा जगाचे मुख्य केंद्र होऊ शकतं असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे विभागीय संचालक डॉ हांस क्लाज यांनी दिला आहे. युरोपममधील ५३ देशांमध्ये गेल्या एक महिन्याचा आढावा घेतला तर करोना संसर्गाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर गेल्या वर्षाप्रमाणे करोना संसर्गाची स्थिती ही युरोपमध्ये निर्माण होऊ शकते डॉ हांस क्लाज यांनी स्पष्ट केलं.
नवज्योत सिद्धू यांनी दिलेला
राजीनामा घेतला मागे
पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद आता थोडा कमी होताना दिसत आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतला आहे. मात्र, नवज्योतसिंग यांनी मात्र कारभार स्वीकारण्याची अट घातली आहे. नवीन एजी आणि डीजीपीचे नवे पॅनल आल्यावर मी पक्ष कार्यालयातील काम हाती घेईन, असे सिद्धू यांचे म्हणणे आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी चरणजीत सिंग चन्नी सरकारच्या नियुक्तीचा निषेध करत राजीनामा दिला होता.
दिल्लीतील प्रदूषण
भाजपा मुळे वाढले
दिल्लीच्या या प्रदूषणाला आता राजकीय वळण मिळालं आहे. दिल्ली राज्य सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी या प्रदूषणाला भाजप जवाबदार असल्याची टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राय म्हणतात “सर्वसामान्य लोकांनी अनेक ठिकाणी फटाके लावले नाहीत. याबाबत आम्ही मोहिम राबवली होती. काही ठिकाणी हे झालं नाही. भाजपच्या लोकांनी फटाके लावले, जाणुनबूजुन लावले, यामुळे रात्री प्रदूषणाचा स्तर वाढला.
कर्णधार पदासाठी राहुल
द्रविडची रोहितला पसंती
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ च्या समाप्तीनंतर भारतीय क्रिकेट संघात अनेक गोष्टी बदलणार आहेत. राहुल द्रविड नवीन मुख्य प्रशिक्षक असेल आणि लोकांना खेळाच्या टी-२० फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणारा एक नवीन चेहरा दिसेल. विराट कोहलीने यापूर्वीच टी-२० विश्वचषकानंतर आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे जाहीर केले होते. आता काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रविडने रोहितला व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये कर्णधारपदासाठी आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले.
अनिल देशमुख यांच्या
मुलाला देखील ईडीचे समन्स
तुरुंगात दिवाळी साजरी करत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने समन्स बजावलं आहे. काल रात्री उशिरा त्यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आज दिपावली पाडव्याच्या दिवशी त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
SD social media
9850 60 3590