भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्करामध्ये दिवाळीनिमित्त सीमेवर मिठाईची देवाणघेवाण झाली. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) क्रॉसिंग पुलावर भारतीय आणि पाक सैन्यांनी एकमेकांना मिठाईची दिली. दिवाळी, होळी, ईद यांसारख्या प्रमुख सणांच्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी लष्करामध्ये सीमेवर एकमेकांना मिठाईची दिण्याची परंपरा आहे.
गुजरातमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि राजस्थानच्या बारमेर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाक रेंजर्समध्येही मिठाईची देवाणघेवाण झाली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी यंदा नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल सैनिकांचे कौतुक केले आणि देशाला जवानांचा अभिमान वाटतो, असं म्हणाले. मी केवळ एकटाच तुमच्याकडे आलो तर 130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, असं पंतप्रधान म्हणाले.