इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिली नरेंद्र मोदी यांना पक्षात सामील होण्याची ऑफर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे इस्रायली समकक्ष नफ्ताली बेनेट यांच्यात पहिली औपचारिक बैठक झाली. यादरम्यान दोन नेत्यांमध्ये एक असा क्षण आला जेव्हा बेनेट यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की ते इस्रायलमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांनी त्यांच्या पक्षात यावे.

ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची भेट घेतली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर विचार विनिमय केला. हवामान शिखर परिषदेदरम्यान सोमवारी संक्षिप्त चर्चेनंतर पंतप्रधान मोदी आणि बेनेट यांची पहिली औपचारिक बैठक झाली.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, बेनेट पंतप्रधान मोदींना म्हणाले, ‘तुम्ही इस्रायलमधील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहात.’ याला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले, ‘धन्यवाद, धन्यवाद.’ त्यानंतर बेनेट यांनी पीएम मोदींना त्यांच्या यामिना पक्षात सामील होण्यास सांगितले. दोन्ही नेत्यांनी हसतमुखाने हस्तांदोलन केले आणि यादरम्यान बेनेट म्हणाले, ‘या आणि माझ्या पक्षात सामील व्हा.’

पंतप्रधान मोदींनी बेनेट यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण करून दिली आणि भारतातील लोक इस्रायलसोबतच्या मैत्रीला खूप महत्त्व देतात, असे सांगितले. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ट्विट केले की, ‘इस्रायलसोबतची मैत्री आणखी घट्ट करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नफ्ताली बेनेट यांची ग्लासगो येथे बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी आपल्या नागरिकांच्या हितासाठी सहकार्याच्या विविध उपाययोजना मजबूत करण्यावर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी आणि बेनेट यांच्यातील ही भेट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या इस्रायल दौऱ्यात मोदींनी इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान झालेले बेनेट पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.