29 वर्षापूर्वी केली चूक, अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

अमिताभ बच्चन सोशल मीडिया वर खूप ऍक्टिव असतात. अनेकदा ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि आपल्या ब्लॉगवर खासगी गोष्टी शेअर करत असतात. या दसऱ्याच्या दिवशी देखील बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र आपल्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक घोड चूक केली. मग काय, एका चाहत्याने त्यांची क्लास घेतली.

बच्चन यांच्या पोस्टवर त्यांच्या एका चाहत्याने त्यांना 29 वर्षांपूर्वीची एका चुकीची आठवण करून दिली. तो म्हणाला की, तुम्ही एका महान कवीचे सुपुत्र आहात. आणि तुम्ही अशी चुक करू नयेत. पण यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बिग बींनी त्या चाहत्याची माफी मागितली.

बिग बींनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, ‘दसऱ्याच्या अनेक शुभेच्छा.’ बिग बींच्या या शुभेच्छांवर फॉलोअर राजेश कुमार यांना चूक आढळली. त्या पोस्ट खाली कमेंट करत त्यांनी लिहिलं की, ‘सर !! ‘खुदा गवाह’ च्या एका सीनमध्ये तुम्ही ‘पेशेवर मुजरिम’ ऐवजी ‘पेशावर मुजरीम’ म्हणताना दिसता. तूम्ही एका महान कवीचे सुपुत्र आहात. दशाननमधून तयार झाला ‘दशहरा’ हा शब्द. ‘दशहेरा’ नाही. . व्यावसायिक जाहिराती बाजूला ठेवा, कमीतकमी शुद्धलेखनाबद्दल सावधगिरी बाळगा. मनापासून अभिनंदन ‘

राजेश कुमार यांच्या या कमेंटवर अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिले की, ‘जे चुकीचे झाले त्याबद्दल मी दिलगीर आहे आणि मी ते दुरुस्त करेन. मला याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. बिग बींनी असे काही करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेक वेळा त्यांच्या फॉलोअर्सना प्रतिसाद दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.