अजिंठा-वेरूळ साठी बसची सुविधा पुन्हा सुरू

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीपर्यंत पर्यटकांना पोहचवण्यासाठी तसेच तेथील पर्यटन घडवून आणण्यासाठी एसटी महामंडळातर्फे जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीसाठी चालवण्यात येणाऱ्या दोन्ही वातानुकुलित पर्यटन बस पर्यटकांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून या बसची सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही सेवा पूर्वत करण्यात आली. या दोन बस 45 आसनी असून एसी बसमुळे विदेशी पर्यटकही यातून प्रवास करू शकतील. या बसच्या माध्यमातून एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळू शकेल.

औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरून वेरूळची बस सकाळी 8.30 वाजता सुटते. तर अजिंठा लेणीसाठी एसी बस सकाळी 8.15 वाजता सुटते. औरंगाबाद-वेरुळचे भाडे 275 रुपये आहे तर औरंगाबाद-अजिंठ्याचे बस भाडे 695 रुपये एवढे आहे.

औरंगाबाद शहरात देशातील तसेच विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे त्यांना अजिंठा आणि वेरूळ येथे जाण्यासाठी वातानुकुलित बस उपलब्ध असावी, या उद्देशाने एसटी महामंडळाला जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात आला होता. या निधीतून दोन वातानुकूलित बस खरेदी करण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानकातून धावणाऱ्या या दोन्ही पर्यटन बसला पर्यटकांना चांगला प्रतिदास मिळत होता. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या बसगाड्या बंद कराव्या लागल्या होत्या. या बस पुणे मार्गावर चालवल्या जात होत्या. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पर्यटन स्थळे सुरु झाली. मात्र पर्यटन बस सुरु होण्याची प्रतीक्षा होती. अखेर गुरुवारपासून या दोन्ही बस पर्यटकांसाठी पुन्हा एकदा धावणार आहेत. तसेच नवरात्रीनिमित्त मध्यवर्ती बसस्थानकातून म्हैसमाळसाठी बस सोडण्यात येत आहे. एसी बसमुळे विदेशी पर्यटकही यातून प्रवास करू शकतील. या बसच्या माध्यमातून एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.