पाकिस्तानात एका हिंदू मुलीने इतिहास रचला आहे. 27 वर्षीय डॉ सना रामचंद गुलवानी सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (CSS) परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. पाकिस्तानच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं आहे, जेव्हा एक हिंदू मुलीला CSS परीक्षेत यश मिळालं आहे. विशेष गोष्ट अशी की सना पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
‘एक्सप्रेस ट्रिब्यून’ ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानातील ही परीक्षा अत्यंत कठीण असते. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की 2 % पेक्षा कमी उमेदवार CSS परीक्षेत यश मिळवू शकले आहेत. सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस उत्तीर्ण झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रशासकीय सेवांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. सना सिंध प्रांताच्या ग्रामीण जागेवरून या परीक्षेत बसल्या होत्या. ही जागा पाकिस्तान प्रशासकीय सेवेच्या अंतर्गत येते.
आपल्या यशावर आनंद व्यक्त करत सना म्हणतात, ‘माझा हा पहिला प्रयत्न होता. पहिल्याचं प्रयत्नात मला हवं ते यश मिळालं आहे.’ सनाने परीक्षेत आपलं नशीब आजमावावं अशी इच्छा त्यांच्या आई-वडिलांची नव्हती. कारण सनाने मेडीकलमध्ये आपलं करियर करावं अशी इच्छा त्यांच्या आई-वडिलांची होती.
सना म्हणते, ‘मी माझे आई वडील दोघांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी डॉक्टर होण्याबरोबरच प्रशासनाचा एक भाग होणार आहे. सना यांनी पाच वर्षांपूर्वी शहीद मोहतारमा बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिनमध्ये पदवी घेतली. त्यानंतर त्या सर्जनही आहेत. यूरोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. सानाने शिकारपूरच्या सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे.