एथनिक कपड्यांचा ब्रॅंड मान्यवर (Manyavar)ची मूळ मालक कंपनी वेदांत फॅशन लिमिटेड आपला आयपीओ (IPO) मार्केटमध्ये आणणार आहे. कंपनीने प्रारंभिक शेअर विक्रीच्या माध्यमातून फंड उभारण्यासाठी कॅपिटल मार्केट रेगुलेटर सेबी (SEBI)कडे कागदपत्र जमा केले आहेत.
ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस(DRHP)च्यामते, IPO मध्ये प्रमोटर्स आणि सध्याच्या शेअरधाराकांद्वारे 36,364,838 इक्विटी शेअर्सची विक्री (Offer for sale) करणार आहेत.
Vedant Fashions Ltd च्या OFS मध्ये राइन होल्डिंग्स लिमिटेडतर्फे 1.74 कोटी शेअर, केदारा कॅपिटलतर्फे 7.23 लाख शेअर आणि रवी मोदी फॅमिली ट्रस्टतर्फे 1.81 कोटी शेअर्सची विक्री सामिल आहे.
वेदांत फॅशन लिमिटेड कंपनीचे प्रमोटर रवी मोदी, शिल्पी मोदी आणि रवी मोदी फॅमिली ट्रस्ट आहे.
वेदांत फॅशन ब्रॅंड मान्यवर देशभरात प्रसिद्ध ब्रॅंडपैकी एक आहे. जे भारतीय लग्नकार्य, सणसमारंभ आणि कार्यक्रमांच्या कपड्यांची विक्री करतात. कंपनीच्या अन्य ब्रॅंडमध्ये त्वेमेव, मंथन, मोहे, मेवाज सामिल आहे.
कंपनीने म्हटले आहे की, एक्सिस कॅपिटल, एडलवाइस फायनान्शिअल सर्विसेस, आयसीआयसीआय सेक्योरिटिज, आयआयएफएल सेक्योरिटिज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल इश्यूच्या बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.