सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी स्टारर चित्रपट शेरशाह सुपरहिट ठरला आहे. ‘शेरशाह’ (Sher Shah) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडत आहे. यासह, सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री आणि कामगिरीची देखील खूप प्रशंसा केली जात आहे.
या चित्रपटात सिद्धार्थनं भारतीय लष्कराचे कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका अतिशय उत्तम आणि मोठ्या उत्साहानं साकारली होती. ज्याचे त्याच्या चाहत्यांनीच नाही तर समीक्षकांनीही खूप कौतुक केलं.
आज सिद्धार्थ त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचे लाखो चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात, मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सिद्धार्थला भारतीय लष्करात भरती व्हायचं होतं, त्यानं नुकतंच दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं.
सिद्धार्थचे आजोबा देखील एक सैनिक होते. ते 1946 मध्ये भारत चीन युद्धात सहभागी होते. आजोबांना बघूनच सिद्धार्थचीही सैन्यात जाण्याची उत्कट इच्छा होती, मात्र नशीबानं आज त्याला अभिनेता बनवलं.
आज चित्रपटाचं सर्व बाजूंनी कौतुक होत आहे, मात्र सिद्धार्थनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही ठिकाणे होती जिथं खूप शारीरिक समस्या आल्या. बऱ्यापैकी थंडी होती पण विक्रमच्या पात्रात येताच त्यानं प्रत्येक कष्टाला तोंड देत कठोर परिश्रम केले. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या ‘शेर शाह’ या चित्रपटाची रिलीज झाल्यापासून चर्चा झाली आहे.
सिद्धार्थनं मोठ्या पडद्यावर अनेक पात्रं साकारली असली तरी तो देशाचा खरा नायक असलेल्या विक्रम बत्राच्या पात्राला आतापर्यंतचं सर्वात कठीण आणि आव्हानात्मक पात्र मानतो. ज्यामध्ये त्याला भावनिकदृष्ट्या खूप मजबूत व्हायचं होतं. कारण विक्रम बत्रा ती व्यक्ती होती ज्यांनी सहजपणे मातृभूमीसाठी आपले प्राण दिले. सिद्धार्थला पडद्यावर अशा शक्तिशाली भूमिका साकारणं खूप आव्हानात्मक होतं.