नांदगाव आगाराच्या परळी-बीड-नांदगाव या एसटी बसला येवल्यातील राजापूर येथे अल्टो कारने समोरासमोर धडक दिल्या मोठा अपघात झाला. ही बस येवल्याकडून नांदगाव येथे जात असताना नांदगाव येथून येणाऱ्या कारने एसटी बसला धडक दिली. यात अल्टो कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत, तर एसटीमधील 40 प्रवाशांना किरकोळ जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे हा अपघात किती भीषण होता हे अपघातानंतरच्या वाहनांच्या स्थितीवरुन पाहता येतंय. अल्टो कार रस्त्याच्या मधोमध उभी असल्याचं पाहायला मिळालं. या अल्टो कारची समोरची बाजू जोरदार धडकेमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. एसटी बस देखील कारच्या धडकेने नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली उतरली. ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात केली. त्यामुळे बसलेल्या झटक्यात बसचं पुढील चाक खराब झालं.
गंभीर जखमींवर येवला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे. (फोटो क्रेडिट गुगल)