शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धकांमध्ये तगडी स्पर्धा सुरु आहे. स्पर्धक एकमेकांना जबरदस्त टक्कर देताना दिसून येत आहेत. यंदा बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हाती लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.घरातील स्पर्धकांना बाहेरूनही मोठा सपोर्ट मिळत आहे. त्यांचे सेलिब्रेटी मित्र, कुटुंबीय आणि चाहते सोशल मीडियावर त्यांना प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत.
दरम्यान फिनालेच्या अवघ्या काही दिवसआधी घरामध्ये शॉकिंग एलिमिनेशन झालेलं दिसून आलं.नुकतच सुम्बुल तौकीर घरातून बाहेर पडली आहे. आता त्यानंतर मिड वीक एव्हिक्शन झालं असून फिनालेपूर्वी अजून एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागला आहे.एक तगडी स्पर्धक समजली जाणारी अभिनेत्री निम्रत कौर अहुवालिया घरातून बाहेर पडली आहे. फिनालेच्या इतके जवळ येऊन घरातून बाहेर पडावं लागल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत.
निम्रत कौर अहुवालिया आणि शिव ठाकरेची मैत्री सगळ्यांनाच परिचित आहे.एलिमिनेशनसाठी निम्रतचं नाव पुकारताच शिव भावुक झाला. तिला घरातून निरोप देताना शिवला अश्रू अनावर झाले.फिनालेमध्ये गेलेल्या टॉप ५ स्पर्धकांची नावे सामोरं आली असून यामध्ये शिव ठाकरे, अर्चना गौतम, स्टॅन, शालीन आणि प्रियांका चौधरीचा समावेश आहे. आता या पाच जणांमधून विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.