आज दि.१४ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

संत तुकाराम महाराजांचे अभंग
आम्हाला ऊर्जा देतात : पंतप्रधान मोदी

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देहू येथे आज पंतप्रधान मोदी आले आहेत. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते. तसेच, संत तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. असे म्हटले. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, लोकार्पणाचा सोहळा असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.

पंढरपूरची वारी ही संधीच्या
समानतेचं प्रतिक : पंतप्रधान मोदी

आज देश सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्रावर चालतो आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणताही भेदभाव न करता सर्वांनाच मिळतोय. देश महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केला जातोय. पंढरपूरची वारी ही संधीच्या समानतेचं प्रतिक आहे. संत तुकाराम महाराज म्हणायचे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणेज समजात शेवटी बसलेल्या व्यक्तीला आपले समजून त्यांचे कल्याण करणे हेच संताचे लक्ष्य आहे. हाच देशासाठी संकल्प आहे. हाच संकल्प घेऊन देश पुढे जातोय. दलित, आदिवासी, मजूर यांचे कल्याण करणे ही प्राथमिकता आहे.

आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने
वारकरी : देवेंद्र फडणवीस

‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हाच मंत्र पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे.

शरद पवार यांना पाठिंबा दिल्याबद्दल
सुप्रिया सुळे यांनी मानले काँग्रेसचे आभार

शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील तर भाजपाने पाठिंबा द्यावा असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, “मला याबदल काहीच माहीत नाही. मी एका संघटनेत काम करते, मी एक खासदार आहे त्यामुळे मला वैयक्तिक मताचा कमी अधिकार असतो”. काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.

आडनावावरून जात गृहित धरली
जाणे चुकीचे : नाना पटोले

राज्यात इतर मागास वर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. परंतु अनेक ठिकाणी केवळ आडनावावरून जात गृहित धरली जात असल्याचे समोर आले असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी संबंधितांना सुचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

लष्कर ए तोयबाशी
संबंधित तरूणाला अटक

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काश्मीरमधून एकास अटक केली. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी एटीएसने या प्रकरणी पुण्यातील दापोडीतील एका तरुणासह तिघांना अटक केली होती. हे अरोपी देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या
बालकांचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विना लग्न म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेल्या बालकांचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार असेल. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, जर जोडपे बऱ्याच काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे तर, या नात्यातून जन्मलेल्या बालकाचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार असेल. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या उलट निर्णय दिला. केरळ उच्च न्यायालयाने अशा मुलांसाठी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीचा अधिकार नाकारला होता. कारण बालकाच्या आईवडिलांनी लग्न केलेले नाही.

पाकिस्तान संघाने ICC वनडे
क्रमवारीत भारताला मागे टाकले

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात क्रिकेट फार लोकप्रिय आहे. क्रिकेट म्हणजे तो खेळ सोडून देशप्रेमापर्यंत जातं. भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी आहे. आयसीसी रँकिंगमध्ये भारताला पाकिस्तानने मागे टाकलं आहे. टीम इंडियाने सध्या कोणताच वन डे सामना खेळला नाही. मुल्तानमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत नुकत्याच झालेल्या यशानंतर बाबर आझमच्या पाकिस्तान संघाने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या ICC वनडे क्रमवारीत भारताला मागे टाकण्यात यश मिळवलं.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.