महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हेच असल्याची साक्ष साक्षीदारांनं दिल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं अंदुरे आणि कळसकर यांना ओळखलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूर येथे यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रकरणी उशीर होत असल्याबद्दल खंत देखील व्यक्त केली आहे. दाभोलकर कुटुंबीयांचं योगदान महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचं आहे.
नरेंद्र दाभोलकर यांची क्रूर हत्या झाली त्याचा सर्वांनी जाहीर निषेध केला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आगामी काळात तशा घटना घडू नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.
दाभोलकरांच्या खूनानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर प्रथमच घटनेतील प्रत्यक्षदर्शीनी आरोपीला ओळखले आहे, यासंदर्भात विचारलं असता, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, की याबाबत उशीर झालेला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आपण अशा घटनांबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.
दाभोलकर कुटुंबीयांचं योगदान महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचं आहे. त्यांची क्रूर हत्या झाली त्याचा सर्वांनी जाहीर निषेध केला आहे. या प्रकारच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात होऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीं लक्ष ठेवलं पाहिजे. या घटना होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
प्रायव्हेट मेंबर बिल्स नावाचा संसदेत एक प्रकार आहे. त्यानुसार मी राइट टु डिस्कनेक्ट बिल आणले आहे. कामाच्या वेळेव्यतिरिक्त डिस्टर्ब करु नये, यासाठी हे बिल मांडलं आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आयुष्य जगता यावे हा यामागचा विचार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाविकास आघाडी वर सातत्याने खोटे आरोप केले जातात. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने खोटेनाटे आरोप केले जात आहेत. सध्या देशासमोर महागाई खूप मोठे आव्हान आहे. चहा पासून तेल, आटा यासह सर्व खाद्यपदार्थ वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, सध्या देशासमोर महागाई हे सर्वात मोठे आव्हान आहे