कोरोनामुळे राज्यात अजूनही प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या नव्हत्या. आता प्राथमिक शाळासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. राज्यात 1 डिसेंबरपासून पुन्हा शाळा सुरू होणार आहे. शाळेची घंटा वाजणार आहे. राज्यात 1 डिसेंबरपासून पहिली ते 10 वी शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
नुकतीच प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती. टास्कफोर्सने शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर प्रशासन आणि टास्क फोर्सने मिळून हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात 8 ते 12 वीच्या शाळा सुरू आहेत. मात्र आता पहिली ते 10 वीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. शाळा सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.