आज दि.२० नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

इंदोर ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वच्छ शहरांना प्रदान करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने सलग 5 व्यांदा इंदौरला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित केले आहे. सुरतला दुसरा क्रमांक मिळाला आहे. मध्य प्रदेशातील इंदौर प्रथम स्थानावर आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी गुजरातमधील सुरत आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा यांना देशातील दुसरे आणि तिसरे स्वच्छ शहर बनल्याबद्दल गौरवले. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात यूपीच्या वाराणसीला सर्वात स्वच्छ गंगा शहराच्या श्रेणीत प्रथम स्थान मिळाले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राचाही गौरव करण्यात आला आहे. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील पहिले सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर ठरले आहे ते म्हणजे विटा – सांगली. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील सर्वोत्कृष्ट 2 रे शहर म्हणजे लोणावळा. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील सर्वोत्कृष्ट 3 रे शहर म्हणजे सासवड. देशात स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र अव्वल असल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील 3 शहरांनी पुरस्कार पटकवला आहे.

रोहितनं एकाच सामन्यात मोडला दोन दिग्गजांचा रेकाॕर्ड

आयसीसी टी-20 विश्वचषकातील पराभव विसरून भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका आपल्या खिशात घातली आहे.

नवा कर्णधार रोहित शर्माने पहिल्या सामन्यात दमदार विजयासह संघाची सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात कर्णधाराने आणखी एक अप्रतिम खेळी खेळली आणि एक शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. रांची येथे झालेल्या दुसऱ्या T20 मध्ये त्याने षटकारांच्या बाबतीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सलग दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांना थोडाफार मार खावा लागला परंतु नंतर संघाने जोरदार पुनरागमन करत किवी संघाला १५३ धावांपर्यंत रोखले. या सामन्यात कर्णधाराने शानदार अर्धशतक झळकावून विजयात मोलाचा वाटा उचलला. या खेळीदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 450 षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे.

महाराष्ट्रात दारु आता स्वस्त, सरकारने एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी घटविली

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

“स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली.,” अधिका-याने सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

एसटी महामंडळाचा आक्रमक पवित्रा, तब्बल 297 कर्मचाऱ्यांना दाखविला घरचा रस्ता

राज्यात मागील अनेक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी अडून बसलेले आहेत. मात्र, राज्य सरकारने विलीनीकरण लगेच शक्य नसल्याचं सांगितलं आहे.

त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला असून राज्य सरकारने तब्बल 297 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. तर रोजंदारीवर असणाऱ्या 238 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अनेक प्रयत्न करूनही एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने राज्य सरकारने आता आक्रमक पवित्रा घेत निलंबन करण्यास सुरुवात केली आहे.

तब्बल १०७ दिवसानंतर व्हेंटिलेटरवरुन रुग्ण बाहेर

विविध चाचण्यांच्या अहवालावरून अखेर १५ वर्षीय युवकाला ‘टिव्हन्स जॉन्सन सिन्ड्रोम्स’ या दुर्मीळ आजाराचे निदान झाले.

श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. रुग्णानेही उपचाराला प्रतिसाद दिला. यामुळे तब्बल १०७ दिवसांनी रुग्ण व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. ही घटना खासगी रुग्णालयातील नव्हे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आहे. मृत्यूच्या दाढेतून मुलाला बाहेर काढल्याने मुलाच्या आईने सर्व डॉक्टरांचे आभार मानले.

गडचिरोली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सुनीलला (बदलेले नाव) मिरगीचा आजार आहे. लहानपणीच पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्यासह दोन मुलांची जबाबदारी आईच्या खांद्यावर आली.

कमला हॕरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा,जो बायडेन आपले सर्व अधिकार सोपवणार

जगातील महसत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन काही दिवसांसाठी आपले सर्व अधिकार उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कॉलोनोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यामुळे आपल्या पदाचे अधिकार काही काळासाठी ते उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार आहेत.व्हाइट हाउसकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, जो बायडन शुक्रवारी आपले सर्व अधिकार काही दिवसांसाठी कमला हॅरिस यांच्याकडे सुपूर्द करतील. ते पुढे म्हणाले की, बायडन प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांची कॉलोनोस्कोपी करण्यात येणार आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.