देशभरातील रामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. 2023 अखेर पर्यंत राम भक्तांसाठी राम मंदिर दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या सदस्यांची नुकतीच अयोध्येत बैठक झाली. ही बैठक ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
त्यानुसार 2023 पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल तर 2025 पर्यंत संपूर्ण 70 एकर परिसर तयार होणार आहे. राम मंदिराचं कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी दोन शिफ्ट मध्ये काम केलं जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. याआधी 2024 पर्यंत राम मंदिराचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. पण आता 2023 अखेर पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.